मराठा आरक्षणाचे जनक देवेंद्र फडणवीस

1982
मराठा आरक्षणासाठीचे पहिले आंदोलन
मराठा आरक्षणासाठीचे पहिले आंदोलन

अण्णासाहेब पाटील यांनी मंडल कमिशनला विरोध करत २२ मार्च १९८२ मध्ये मुंबईत मराठा आरक्षणासह इतर 11 मागण्यांसाठीचा पहिला मोर्चा काढला गेला. आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी त्यावेळी करण्यात आली. पण त्यांची एकही मागणी मान्य न झाल्याने अण्णासाहेब पाटील यांनी लगेच दुसऱ्या दिवशी आत्महत्या केली.

1997
मराठा हे मूलत: कुणबी
मराठा हे मूलत: कुणबी

मंडल आयोग जाहीर झाल्यानंतर जातीच्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी होऊ लागली. या मागणीबरोबरच मराठा महासंघ आणि मराठा सेवा संघाने १९९७ मध्ये सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठी आंदोलन केले केले. या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा हे उच्चवर्णीय नव्हे तर ते मुलत: कुणबी असल्याचे सांगितले…Read More

2009
काँग्रेसच्या नेत्यांचाही मराठा आरक्षणाला पाठिंबा
काँग्रेसच्या नेत्यांचाही मराठा आरक्षणाला पाठिंबा

माजी मुख्यमंत्री शरद पवार आणि विलासराव देशमुख या दोन्ही नेत्यांनी देखील मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मराठा महासंघाच्या मागणीला पाठिंबा दिला होता. त्यावेळी काँग्रेसचे अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते.

2012
मराठा समाज आरक्षण समितीची स्थापना
मराठा समाज आरक्षण समितीची स्थापना

मराठा संघटनांकडून सातत्याने होत असलेल्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी डिसेंबर २०१२ मध्ये कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाज आरक्षण समितीची स्थापना केली. मराठा समाजाची सामाजिक स्थिती जाणून घेण्यासाठी राज्यभर सर्वेक्षण करून, विविध विभागात जाऊन जनसुनवाई घेऊन, विविध संघटनांचे म्हणणे ऐकून मराठा समाजाची माहिती गोळा करण्याचे काम समितीकडे…Read More