सोने चांदीचे खरेदी करणाऱ्यांना सांगू इच्छितो की आज सोन्याचे भाव कमी झाले आहेत तर चांदीच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. 999 प्युरीटी असलेले 24 कॅरेट चे 10 ग्रॅम सोने 50779 रुपयांना मिळत आहे. तर एक किलो चांदी आज 319 रुपयांनी महागले आहे. पुढे वाचा सोन्या चांदीचा आजचा भाव
आजचे सोन्या-चांदीचे भाव
भारतीय सराफा बाजाराने शुक्रवारी सोन्या-चांदीचे भाव घोषित केले आहेत. लेटेस्ट गोल्ड रेट नुसार सोने आज स्वस्त झाले आहे तर चांदीच्या भावात वाढ झालेली पहावयास मिळत आहे. 24 कॅरेट ची शुद्धता असलेले दहा ग्रॅम सोने आज 50779 रुपयांना मिळत आहे, तर 999 प्युरीटी असलेले एक किलो चांदी 319 रुपयांनी वाढून 54639 रुपयांना मिळत आहे.
सोने चांदीचे रेट सांगणारी अधिकारीक वेबसाईट ibjarates.com नुसार शुक्रवारी सकाळी 24 कॅरेट ची शुद्धता असलेले दहा ग्रॅम सोने ₹ 50576 या किमतीला विकले जात होते. ज्याच्या किमतीत आता घट झालेली आहे याशिवाय सध्या 22 कॅरेट शुद्धता असलेल्या सोने ₹ 46514 या किमतीला मिळत आहे.
सोने आणि चांदीच्या भावातील बदल
सोन्याच्या चांदीच्या किमतीत नेहमी वाढ आणि घट होत असते. आज चांदीचे भाव वाढलेले आहेत परंतु सोन्याच्या भावांमध्ये 123 रुपये प्रति 10 ग्रॅम ची घट झालेली आहे. याशिवाय चांदी पाहिली तर आज एक किलो चांदीची किंमत 379 रुपयांनी महागली आहे.
कसे ओळखावे? – How to Identify Gold at Home in Marathi
सोने खरेदी करण्याआधी त्याची शुद्धता तपासून पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढे आपणास सोने कसे ओळखावे यासाठी काही उपयोग माहिती देत आहोत.
1) हॉलमार्क : भारत शासनाने संपूर्ण देशात सोन्याच्या खरेदीवर हॉलमार्किंग लागू केलेली. म्हणून जर आपण सोने खरेदी करू इच्छिता तर आपणास हॉलमार्किंग वर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे हॉलमार्क हे सोन्याची गुणवत्ता ठरवण्याचे कार्य करते. 22 कॅरेट सोन्या वर 916.21, 21 सोन्यावर 875 आणि 18 कॅरेट सोन्यावर 750 हा हॉलमार्किंग्चा शिक्का असतो. हॉल मार्क द्वारे आपण सोन्याची ओळख करू शकतात. व त्यानुसार किंमत जाणून घेऊ शकतात.
2) सोने ओळखण्यासाठी पाण्याचा उपाय
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी तुम्हाला एका बादलीत पाणी घ्यायचे आहे. आणि या पाण्यात सोने टाकायचे आहे. जर सोने पाण्यात आज बुडाले तर समजावे की सोने शुद्ध आणि खरे आहे. याउलट जर सोने पाण्यावर काही वेळ तरंगत राहिले तर समजावे की सोने नकली आहे. शुद्ध सोने कितीही हलके का असेना ते पाण्यात टाकल्या बरोबर आत बुडते.
3) दात चाचणी
सोन्याला ओळखण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे आपण त्याला आपल्या दातांमध्ये दाबून पाहू शकतात. जर दात लावल्यावर सोने दाबले जात असेल व त्यावर दातांची निशान येत असतील तर समजावे की सोने असली आहे. इतर धातु मिश्रित सोन्यावर दातांची निशान उमटत नाही. ऑलिंपिक मध्ये विजेते खेळाडू आपल्या दातांखाली गोल्ड मेडल दाबतात. या मागील कारण सोन्याची शुद्धता तपासणे हे असते.
4) चुंबक चा वापर
सोने ओळखण्यासाठी तुम्ही चुंबक चा वापर देखील करू शकतात. जर सोन्यामध्ये इतर काही धातू मिश्रित असतील तर ते चुंबका कडे आकर्षिले जाते. यासाठी एक शक्तीशाली चुंबक सोन्याच्या दागिन्या जवळ धरावे. जर दागिने थोडे देखील त्या चुंबका कडे आकर्षित झाले तर समजावे की सोन्यात भेसळ आहे.
सोन्याची किंमत जाणून घेत राहण्यासाठी sonyachabhav.com या संकेत स्थळाला भेट देत रहा..