सोन्याची शुद्धता व खरे सोने कसे ओळखावे | How to Identify Gold at Home in Marathi

सोने खरेदी करीत असताना सोने खरे आहे की खोटे याची खात्री करणे फार महत्त्वाचे असते. सोबतच सोन्याची शुद्धता देखील आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. आजच्या या लेखात आम्ही आपल्याला शुद्ध सोने कसे ओळखावे व सोन्याची शुद्धता कशामध्ये मोजतात याविषयी माहिती देणार आहोत

सोने कसे ओळखावे

सोन्याची शुद्धता कशामध्ये मोजतात? सोन्याचे कॅरट म्हणजे काय?

या आधी की आपण शुद्ध सोने कसे ओळखावे या विषयाची माहिती प्राप्त करू आपणास माहीत असायला हवे की गोल्ड कॅरेट म्हणजे काय? कॅरट हे सोन्याची शुद्धता तपासण्याचे एक माप आहे. सोन्याची शुद्धता ही कॅरट(karat) मध्ये मोजतात. कॅरट चे मूल्य जितके जास्त राहील, सोने तितकेच अधिक शुद्ध असते. कॅरट ला 0 ते 24 च्या आत मोजले जाते. आणि म्हणून 24 कॅरट सोने सर्वाधिक शुद्ध सोने मानले जाते. शुद्ध 24 कॅरेटचे सोने अत्यंत मऊ असते. ज्यामुळे त्याच्या पासून दागिने बनवणे शक्य नसते.

24 कॅरट पेक्षा कमी कॅरेटचे सोने बनवण्यासाठी अन्य धातू जसे तांबे, निकेल, चांदी इत्यादींना सोन्यामध्ये जोडले जाते. व या धातू मुळे सोने टणक आणि मजबूत होते.

गोल्ड कॅरट चे प्रकार

बाजारात उपलब्ध असलेले सोने, गोल्ड कॅरेट पुढील प्रमाणे आहेत :

  • 24 कॅरेट सोने : 24 कॅरेट सोने 99.99 टक्के शुद्ध असते आणि ह्या सोन्याला शुद्ध सोने देखील म्हटले जाते. 24 कॅरेट पेक्षा शुद्ध सोने बाजारात उपलब्ध नाही. 24 कॅरेट हे सोन्याचे जगातील सर्वाधिक शुद्ध माप आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव नियमित कमी जास्त होत असतो. 24 कॅरेट सोन्याचे दागिने व आभूषणे बनवणे शक्य नसते. म्हणून हे सोने दागिने बनवण्याऐवजी गुंतवणुकीसाठी योग्य आहे.
  • 22 कॅरेट सोने : या सोन्यात 2 भाग हे इतर धातूंचे मिसळले जातात. 22 कॅरट सोन्यामध्ये शुद्ध सोन्याचे प्रमाण 91.67 असते व इतर भाग हा तांबे, जिंक या सारख्या धातूंना मिक्स करून बनवला जातो. हॉल मार्क असलेल्या 22 कॅरेट सोन्यावर 916 गोल्ड असे लिहिलेले असते.
  • 18 कॅरट सोने : या सोन्यातील 6 भाग हे इतर धातूंचे बनवले जातात. 18 कॅरेट सोन्यामध्ये शुद्ध सोन्याचे प्रमाण 75% असते आणि ज्यामध्ये 25% इतर धातू जसे झिंक, तांबे, निकेल इत्यादी मिसळले जातात. 18 कॅरेट सोने 22 व 24 कॅरेट सोन्याचा तुलनेत अधिक टणक आणि टिकाऊ असते.
  • 14 कॅरेट सोने : हे सोने 58.3% शुद्ध सोने आणि 41.7% इतर धातू पासून बनलेले असते. 14 कॅरेट सोने हे टिकाऊ असण्यासोबतच स्वस्त असते. हे सोने दैनंदिन वापरासाठी उपयोगात आणले जाऊ शकते.

वर देण्यात आलेल्या सोन्याएवजी 10 कॅरेट आणि 9 कॅरेट सोने देखील बाजारात उपलब्ध असते. परंतु या मध्ये सोन्याचे प्रमाण फार कमी असते.

सोने कसे ओळखावे? – How to Identify Gold at Home in Marathi

सोने खरेदी करण्याआधी त्याची शुद्धता तपासून पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढे आपणास सोने कसे ओळखावे यासाठी काही उपयोग माहिती देत आहोत.

1) हॉलमार्क : भारत शासनाने संपूर्ण देशात सोन्याच्या खरेदीवर हॉलमार्किंग लागू केलेली. म्हणून जर आपण सोने खरेदी करू इच्छिता तर आपणास हॉलमार्किंग वर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे हॉलमार्क हे सोन्याची गुणवत्ता ठरवण्याचे कार्य करते. 22 कॅरेट सोन्या वर 916.21, 21 सोन्यावर 875 आणि 18 कॅरेट सोन्यावर 750 हा हॉलमार्किंग्चा शिक्का असतो. हॉल मार्क द्वारे आपण सोन्याची ओळख करू शकतात. व त्यानुसार किंमत जाणून घेऊ शकतात.

2) सोने ओळखण्यासाठी पाण्याचा उपाय
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी तुम्हाला एका बादलीत पाणी घ्यायचे आहे. आणि या पाण्यात सोने टाकायचे आहे. जर सोने पाण्यात आज बुडाले तर समजावे की सोने शुद्ध आणि खरे आहे. याउलट जर सोने पाण्यावर काही वेळ तरंगत राहिले तर समजावे की सोने नकली आहे. शुद्ध सोने कितीही हलके का असेना ते पाण्यात टाकल्या बरोबर आत बुडते.

3) दात चाचणी
सोन्याला ओळखण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे आपण त्याला आपल्या दातांमध्ये दाबून पाहू शकतात. जर दात लावल्यावर सोने दाबले जात असेल व त्यावर दातांची निशान येत असतील तर समजावे की सोने असली आहे. इतर धातु मिश्रित सोन्यावर दातांची निशान उमटत नाही. ऑलिंपिक मध्ये विजेते खेळाडू आपल्या दातांखाली गोल्ड मेडल दाबतात. या मागील कारण सोन्याची शुद्धता तपासणे हे असते.

4) चुंबक चा वापर
सोने ओळखण्यासाठी तुम्ही चुंबक चा वापर देखील करू शकतात. जर सोन्यामध्ये इतर काही धातू मिश्रित असतील तर ते चुंबका कडे आकर्षिले जाते. यासाठी एक शक्तीशाली चुंबक सोन्याच्या दागिन्या जवळ धरावे. जर दागिने थोडे देखील त्या चुंबका कडे आकर्षित झाले तर समजावे की सोन्यात भेसळ आहे.

सोन्याची किंमत कशी माहीत करावी

आपण जर सोन्याचा भाव माहीत करू इच्छिता तर आजचा सोन्याचा भाव या लिंक वर क्लिक करून आमच्या वेबसाइट वर जाऊन चेक करू शकतात.

या लेखाद्वारे आपण जाणून घेतले की खरे सोने कसे ओळखावे (How to Identify Gold at Home in Marathi) व सोन्याची शुद्धता कशामध्ये मोजतात. आपण या माहितीला आपले कुटुंबीय व जवळच्या सर्व लोकांसोबत शेअर करा. जेणेकरून ते देखील या विषयी जागृत होतील. सोने, चांदी व इतर दागिने विषयी ची माहिती प्राप्त करण्यासाठी आपण आमच्या वेबसाइट ला भेट देऊ शकतात.